इचलकरंजी बस स्थानकावर चोरी... दोन महिलांना अटक  

साडेतीन लाखाचा ऐवज हस्तगत

<p>इचलकरंजी बस स्थानकावर चोरी... दोन महिलांना अटक  </p>

इचलकरंजी – शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावरून चार दिवसांपूर्वी कांचन संजय कांबळे या इचलकरंजी ते पुणे या एस. टी. बसने निघाल्या होत्या. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले होते. कांबळे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली होती.

 पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. यावरून पोलीस उपनिरीक्षक  प्रविण साने, प्रदीप जाधव, सहायक फौजदार रावसाहेब कसेकर आणि त्यांच्या पथकाने गीता चौगले आणि दिपाली लोंढे या दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले.  त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघींकडून चोरीला गेलेले ३ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. न्यायालयाने या दोघींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.