सोशल मीडियावरून महिला उमेदवाराला धमकी...

हिंदुत्ववादी संघटनांची कारवाईची मागणी

<p>सोशल मीडियावरून महिला उमेदवाराला धमकी...</p>

कोल्हापूर - महापालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग क्रमांक बारा मधून इच्छुक असलेल्या रश्मीताई साळोखे यांनी नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. सोशल मीडियावरही त्यांनी प्रचार सुरू केला आहे. मात्र सोशल मीडियावरून त्यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषेत धमकी देण्यात आली आहे. त्या  धमकी देणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना निवेदन सादर केले. उपाधीक्षक पाटील यांनी, साळोखे यांना धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

 यावेळी रश्मीताई साळोखे, हिंदू एकताचे शहर अध्यक्ष गजानन तोडकर, दीपक देसाई, बंडा साळुंखे, उदय भोसले, निरंजन शिंदे, संदीप सासने, विक्रम जरग, अनिरुद्ध कोल्हापुरे  यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.