नूल येथे दोन एकरांतील ऊस जळून खाक... अडीच लाखाचे नुकसान 

<p>नूल येथे दोन एकरांतील ऊस जळून खाक... अडीच लाखाचे नुकसान </p>

कोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील अजित नडगदल्ली यांच्या उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. या आगीत  दोन एकर क्षेत्रातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 
यामध्ये स्प्रिंकलर सेट आणि ठिबक योजनेच्या पाईप्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. या आगीमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  
नूल-मुगळी रस्त्यावरील अशोक मुत्नाळे यांच्या घरासमोरून निलजी बंधाऱ्याकडे गेलेल्या पाणंद रस्त्यावर अजित नडगदली यांची शेती आहे. जळालेल्या दोन एकरांमध्ये ड्रीपच्या पाईप घातलेल्या होत्या. नडगदल्ली यांच्या शेतामधूनच विद्युत मंडळाचे पोल पुढे गेले आहेत. वीज मंडळाच्या खांबाजवळच नारळाचे झाड आहे. नारळाच्या झाडाच्या लांब पानांचा स्पर्श विद्युत तारेशी होऊन ठिणगी पडल्या आहेत. शेतामध्ये असलेले स्प्रिंकलर सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.