पोलिसांकडून चंदनाची लाकडे जप्त...
चंदन तस्करी करणारे दोघेजण पसार
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कागल - निढोरी मार्गावरील मळगे बुद्रुक गावाजवळ कारवाई करत दुचाकीवरून चंदनाचे लाकुड घेवून निघालेल्या दोघांकडील चंदनाचे लाकूड आणि दुचाकी असा १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मात्र पोलिसांनी दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर चंदन तस्करी करणारे दोघेजण रस्त्यात दुचाकी सोडून पसार झाले. पोलिसांनी या दोघां विरोधात मुरगूड पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार हिंदुराव केसरे, रोहित मनि, राजू कोरे, समीर कांबळे, संजय पडवळ, अमित मर्दान, संजय हंबे यांनी या कारवाई सहभाग घेतला.