“भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालवणला आल्यानंतरच पैसे वाटपाचे व्यवहार वाढले...” – आमदार निलेश राणे यांची टीका

<p>“भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालवणला आल्यानंतरच पैसे वाटपाचे व्यवहार वाढले...” – आमदार निलेश राणे यांची टीका</p>

मालवण – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मालवणमध्ये मोठी राजकीय खळबळ उडालीय. शिवसेना (शिंदे गट) नेते व आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या घरी अचानक धाड टाकून २५ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केल्याचा दावा केलाय. या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. २ डिसेंबरच्या नगर परिषद आणि नगर पंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टिंग ऑपरेशनद्वारे ही धाड टाकण्यात आली. हिरव्या पिशवीत लपवलेली रोकड मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरायची होती, असा गंभीर आरोप राणेंनी केलाय. त्यांनी तात्काळ निवडणूक विभाग व मालवण पोलिसांना बोलावून पंचनामा करण्यास सांगितलं. या कारवाईनंतर महायुतीत अंतर्गत कलह उफाळून आलाय.

यानंतर राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट टीका केली. “चव्हाण मालवणला आल्यानंतरच पैसे वाटपाचे व्यवहार वाढले,” असा आरोप करत त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे म्हटलंय.