राष्ट्रवादी नेते राम खाडे यांच्यावर महामार्गावर प्राणघातक हल्ला; राजकीय कटाची चर्चा

<p>राष्ट्रवादी नेते राम खाडे यांच्यावर महामार्गावर प्राणघातक हल्ला; राजकीय कटाची चर्चा</p>

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर नगर–सोलापूर महामार्गावर प्राणघातक हल्ला झाला आहे. . हल्लेखोरांनी अंधारात गाडी अडवून दगडफेक, तोडफोड केली आणि गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात  खाडे आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर मिळालेले शस्त्र आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास सुरू आहे. हल्ल्यामागे राजकीय कट असल्याचा आरोप व्यक्त केला जात आहे. खासदार बजरंग सोनवणे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली  आहे.