टीईटी पेपर लीक टोळी पकडली; रॅकेटचा विस्तार उत्तर भारतापर्यंत...

<p>टीईटी पेपर लीक टोळी पकडली; रॅकेटचा विस्तार उत्तर भारतापर्यंत...</p>

कोल्हापूर - टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पेपर लीक करण्याच्या तयारीत असलेली मोठी टोळी अटक करण्यात आली असून याचे कनेक्शन थेट उत्तर भारतापर्यंत पोहोचत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली.

२२ नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी परीक्षेआधीच पेपर फॉरवर्ड करून उमेदवारांना पास करण्याचा डाव आखणाऱ्या टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी एकाच वेळी चार टीम्समार्फत कारवाई केली. या कारवाईत एकूण १८ आरोपींना जेरबंद करण्यात आलंय. मुख्य आरोपी महेश गायकवाड याची पडताळणी करताना या रॅकेटचा विस्तार उत्तर भारतातील काही राज्यांपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात काही शिक्षकांचाही सहभाग असल्याचे संकेत मिळाले असून रॅकेटमार्फत लाखोंची उलाढाल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उर्वरित संशयितांचा तपास करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके उत्तर भारतात रवाना केली आहेत.