धक्कादायक! पुण्यातील महिलेने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा ,कोल्हापुरातील तरुणाचा गंभीर आरोप
पुणे शहरात घडलेल्या एका विचित्र आणि धक्कादायक प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पुण्यातील एका महिलेने गुंगीचे औषध देऊन आपल्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप कोल्हापूर येथील ३७ वर्षीय पुरुषाने केला आहे. याप्रकरणी त्यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे.
संबंधित महिला स्वतःला वकील असल्याचे सांगत त्याला धमकावत होती. गुंगीचे औषध दिल्यानंतर तीने त्याच्यावर बळजबरी केली आणि त्याचे अश्लील फोटो काढून आर्थिक मागण्या सुरू केल्या. असे तक्रारीत म्हटले आहे.आरोपी महिलेने केवळ पुण्यातील तिच्या राहत्या घरातच नव्हे तर कोल्हापूरमधील फिर्यादीच्या निवासस्थानीही जाऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच तिने फिर्यादीला जबरदस्तीने काशी विश्वनाथ परिसरात नेऊनही अत्याचार केल्याचा दावा केला आहे. फिर्यादीवर मानसिक दडपण टाकत पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गौरी वांजळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.