बालिंग्यातील गर्भपात रॅकेट प्रकरणातील एजंटाला पोलिस कोठडी

<p>बालिंग्यातील गर्भपात रॅकेट प्रकरणातील एजंटाला पोलिस कोठडी</p>

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील बालिंगा येथे  बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील हा बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करत असल्याची माहिती शाहूवाडी पोलिसांना मिळाली होती. ही माहिती त्यांनी करवीर पोलिसांना कळवली होती.

सोमवारी आरोग्य विभागाच्या गर्भलिंग निदान शोधून मोहीम पथकाने बालिंगा येथे  छापा टाकत गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. मात्र कारवाईची कुणकुण लागताच बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील हा तिथून पसार झाला. यावेळी एजंट दिगंबर मारुती किल्लेदार हा पोलिसांना मिळून आला होता. आज दिगंबर किल्लेदार याला न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर पोलिसांकडून डॉक्टर स्वप्नील पाटीलचा शोध सुरू असून पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले अधिक तपास करीत आहेत.