दहशत माजवणाऱ्या चौघांची शिरोली पोलिसांनी काढली धिंड...

<p>दहशत माजवणाऱ्या चौघांची शिरोली पोलिसांनी काढली धिंड...</p>

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील  विलासनगर परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला दिगंबर कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैभव बेडेकर याच्यासह चौघांनी प्राणघातक शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केले होते.

यानंतर चौघांनी परिसरात हातात हत्यारे घेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी वैभव बेडेकर, आर्यन शिंदे, साहिल बनगे, साहिल उर्फ गणेश शिद्रक या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान दहशत निर्माण करणाऱ्या चौघांची पुलाची शिरोली परिसरात धिंड काढली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.