शेड भाड्याने देतो सांगून केली फसवणूक...
 

 कागलमधील एकाला अटक

<p>शेड भाड्याने देतो सांगून केली फसवणूक...<br />
 </p>

कोल्हापूर – शहरातील हरिओम नगर परिसरात कुमार वरद पाटील हे राहतात. कागल पंचतारांकित वसाहतीत असलेलं शेड , भाड्याने देण्याची वर्तमानपत्रात आलेली जाहिरात वाचून पाटील यांनी कागल मधील सतीश खोडवे याच्याशी संपर्क केला होता. खोडवे याने पाटील यांच्याकडून करारपत्र करून धनादेशद्वारे तीन लाख रुपये घेतलेत. शिवाय पाटील यांनी शेड डागडुजीसाठी ४० हजार रुपये खर्च केलेत. मात्र कराराचा भंग केल्याने पाटील यांनी खोडवे याच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली. 


त्यानंतर पोलिसांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या खोडवे याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान खोडवे यानं अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली असल्याचं समजतंय. त्यानं कोणाचीही फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा, असं आवाहन राजारामुपरी पोलिसांनी केले आहे.