पुलाची शिरोलीत तरुणावर जीवघेणा हल्ला...

<p>पुलाची शिरोलीत तरुणावर जीवघेणा हल्ला...</p>

कोल्हापूर - गणपती विसर्जन मिरवणूकीत  झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून  पुलाची शिरोलीत एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. दिगंबर रघुनाथ कांबळे असे त्या तरुणाचे नाव आहे. हा हल्ला काल रात्री १० च्या सुमारास कोरगावकर कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर करण्यात आला.


दिंगबरवर आणि त्याच्या पत्नीवर चौघांनी एडक्यांनी वार केला आहे. यामध्ये दिंगबरची डाव्या हाताची बोटं तुटली असून दोन्ही हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैभव बेडेकर, साहिल बनगे (रा.आंबेडकर चौक), गणेश शिदरुक (रा.सावंत काॅलनी), आणि एक अनोळखी या चौघांनी दिंगबरवर एडक्याने वार केला आहे. याची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत.