वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लढवली ‘ही’ शक्कल

<p>वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लढवली ‘ही’ शक्कल</p>

पुणे – शहरात वाहन अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागत आहे. पुणे शहरातील नवले पुलावर झालेल्या अपघातामुळे 8 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 16 जण जखमी झाल्याने शहर हादरले. यामुळे पुणे पोलिसांनी शक्कल लढवत वाहनधारकांसाठी नियमावली जारी केली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन जप्त केले जाणार आहे, तीनपेक्षा जास्त वेळा नियमांचं उल्लंघन केल्यानंतर वाहतूक परवाना रद्द केला जाणार असल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे पुणे शहरात वाहन चालवताना सर्वसामान्य वाहनधारकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.