तीर्थयात्रेसाठी गेलेल्या बसचा अपघात... तब्बल 42 भारतीयांचा होरपळून मृत्यू

<p>तीर्थयात्रेसाठी गेलेल्या बसचा अपघात... तब्बल 42 भारतीयांचा होरपळून मृत्यू</p>

नवी दिल्ली - सौदी अरेबियात तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला आग लागल्याने  तब्बल ४२  भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्या आहे.

सौदी अरेबियातील मदिना येथे प्रवासी बस आणि एका डिझेल टँकरची रविवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी जोरदार धडक झाली. या धडकेनंतर प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात  बसला आग लागली आणि बसमधील भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या बसमध्ये मदिना येथे तीर्थयात्रेसाठी गेलेले भारतीय नागरिक होते.हे सर्वजण हैदराबाद आणि तेलंगणा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.