एलसीबीची गांजा तस्करीवर कारवाई

 

कागल–निढोरी मार्गावर सापळा; एक जण अटक, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

<p>एलसीबीची गांजा तस्करीवर कारवाई</p>

<p> </p>

कोल्हापूर – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कागल–निढोरी मार्गावर सापळा रचून एका व्यक्तीला गांजासह अटक केली. शरद परंबकर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 330 ग्रॅम गांजा आणि मॉपेड असा एकूण 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. कागल–निढोरी मार्गावर संशयित तरुण मॉपेडवरून गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. काही वेळातच संशयित परंबकर जाळ्यात अडकला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून 330 ग्रॅम वजनाचा गांजा, मॉपेड व अन्य साहित्य असा एकूण 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गांजा कुठून घेतला आणि कुणाला पुरवित होता, याबाबत पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, मुरगुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, विशाल खराडे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, रोहित मर्दाने, अशोक पवार आणि गजानन गुरव यांनी सहभाग घेतला.