विश्वास संपादन करून साडेतीन लाखाची फसवणूक...कोडोली पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल

<p>विश्वास संपादन करून साडेतीन लाखाची फसवणूक...कोडोली पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल</p>

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील चंद्रकांत यादव महापुरे यांची कागल तालुक्यातील बोरवडे येथील सुनील बलुगडे यांच्याशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत सुनील बलुगडे त्यांचा मुलगा वैभव सुनील बलुगडे, मुली पूजा आणि प्राजक्ता सबलगुडे यांनी आम्ही आर्थिक अडचणीत आहोत. आमच्या घरावर बँकेने जप्ती आणलीय त्यासाठी आर्थिक मदत करा, अशी विनवणी यादव महापुरे यांच्याकडे केली.

त्यानंतर २२ फेब्रुवारी २०२४ रोजी महापुरे यांनी सुनील बलुगडे यांच्या खात्यावर दोन लाख रूपये ऑनलाईन पाठवले. पुन्हा सहा एप्रिल २०२५ रोजी पन्नास हजार, सात एप्रिल २०२५ रोजी पन्नास हजार आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी पन्नास हजार असे एकूण साडेतीन लाख रुपये बलुगडे कुटुंबियांनी महापुरे यांच्याकडून घेतले. या मोबदल्यात दोन धनादेश सह्या करून दिले. महापूरे यांनी पैशाचा तगादा लावल्यावर बलुगडे कुटुंबियांनी वेळोवेळी मुदत मागून घेत बँकेत चेक न भरण्याची विनंती महापुरे यांना केली. अखेर पैसे मिळत नसल्याने महापुरे यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर पोलिसांनी सुनील बलुगडे, वैभव बलुगडे, पूजा आणि प्राजक्ता बलगुडे या चौघा विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. कोडोली पोलिसांनी दोघांपैकी सुनील बलुगडे आणि वैभव बलुगडे या दोघांना ताब्यात घेतले आहे.