फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पोलिसाला सेवेतून केलं बडतर्फ... 

<p>फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पोलिसाला सेवेतून केलं बडतर्फ... </p>

फलटण – फलटणमधील शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि  प्रशांत बनकर हे दोघे तुरुंगात आहे. यातील गोपाल बदने याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. परंतु  आज विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आरोपी पोलीस गोपाल बदने याला सेवेतून बडतर्फ केले आहे.

पोलीस दलाचे पुर्ण ज्ञान असताना, बेफिकिरीने, नैतिक अधःपतन व दुर्वर्तन, विकृतपणे पोलिस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग, यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणुक केली. तसेच  पोलिस उपनिरीक्षक पदास अशोभनिय ठरेल असे कृत्य करुन कर्तव्य पालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. तसेच त्याने  केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने यास या पुढे शासकीय सेवेत कर्तव्यार्थ ठेवणे सार्वजनिक आणि  लोकहिताचे दृष्टीकोनातुन उचित होणार नसल्याचे  विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी म्हटले आहे.