कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळंबा कारागृहाला दिली भेट...

<p>कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळंबा कारागृहाला दिली भेट...</p>

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहात यापूर्वी कधी अंमली पदार्थ तर कधी मोबाईल पेन ड्राईव्ह अशा वस्तू मिळून आल्या होत्या. दरम्यान शनिवारी कळंबा कारागृहातील सुभेदार उमेश चव्हाण यांनी कारागृहातील सर्कल क्रमांक सात मधील स्वच्छता गृहाची झडती घेतली. यावेळी पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीच्या दोन गुंडांकडे जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. या प्रकरणी सुभेदार उमेश चव्हाण यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय.

या फिर्यादीवरून सुरेश दयाळू आणि अमीर उर्फ चंक्या खान या दोघांच्या विरोधात रविवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेची कारागृह विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. आज कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तपासणी केली आहे.