महाराष्ट्र केसरी पैलवान सिंकदर शेखला शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात अटक; पंजाब पोलिसांची कारवाई
पंजाब - एसएएस नगर पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र तस्करी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दानवीर, बंटी, सिकंदर शेख आणि कृष्ण कुमार उर्फ हॅपी गुज्जर या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच पिस्तूल, दोन वाहने आणि २ लाख रोख जप्त केले. पंजाब पोलिसांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडियावर ( @DGPPunjabPolice ) हे जाहीर केले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, मुख्य आरोपी दानवीर हा हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये “पापला गुज्जर” टोळीशी संबंधित आहे. तो बंटीसह, हॅपी गुज्जर आणि सिकंदर शेख यांना शस्त्रे पोहोचवण्यासाठी आला होता. त्यांना ताब्यात घेऊन एसएएसनगर येथील सदर खरार येथील पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.