राजारामपुरी पोलिसांची कारवाई : बेकायदेशीर विदेशी दारू वाहतूक प्रकरणात एकाला अटक

<p>राजारामपुरी पोलिसांची कारवाई : बेकायदेशीर विदेशी दारू वाहतूक प्रकरणात एकाला अटक</p>

कोल्हापूर – राजारामपुरी पोलिसांनी सायबर चौक परिसरात कारवाई करत बेकायदेशीररीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. प्रथमेश यशवंत पाटील (रा. कोल्हापूर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन लाख 85 हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चारचाकी वाहनाद्वारे बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची राजारामपुरी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायबर चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. तपासात संबंधित वाहनातून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा आढळून आला. पुढील तपास राजारामपुरी पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश चंदन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात अंमलदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, सचिन पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर आणि सुशांत तळप यांनी सहभाग घेतला.