कागलच्या विशाल कांबळेला विनयभंगाबद्दल तेरा महिने सक्तमजूरीची शिक्षा

<p>कागलच्या विशाल कांबळेला विनयभंगाबद्दल तेरा महिने सक्तमजूरीची शिक्षा</p>

कोल्हापूर - सप्टेंबर २०२१ मध्ये विशाल कांबळे याने पीडित अल्पवयीन मुलगी एका किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी गेली असताना तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विशाल कांबळे याच्या विरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कागल पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांनी या प्रकरणी तपास करून विशाल कांबळे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखलं केलं होतं.

 या प्रकरणी आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी सरकारी वकील अॅडव्होकेट प्रतिभा जाधव यांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून विशाल उर्फ विश्वनाथ कांबळे आला १३ महिने सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.