खळबळजनक : मुंबईत ऑडिशनच्या नावावर 20 ते 22 मुला-मुलींना डांबलं स्टुडिओत
मुंबई – मुंबईतील पवई येथे ऑडिशन असल्याचे सांगत रोहित आर्य या व्यक्तीने 15 वर्षांखालील 20 ते 22 मुला-मुलींना डाबून ठेवले होते. यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
रोहित आर्य या आरोपीला ताब्यात घेत असताना पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून या भागात शूटिंग ऑडिशन चालू होतं. मात्र, आज सर्व मुलांना ओलीस ठेवून रोहित आर्य याने व्हिडिओद्वारे माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने ओलीस ठेवणाऱ्या मुलांची सुटका करण्यात आली आहे.