इचलकरंजीत छठ पूजेवेळी बेपत्ता झालेल्या तरूणाचा ७२ तासांनी मृतदेह सापडला...
इचलकरंजी - शहरातील पंचगंगा नदी घाट परिसरात शहरातील योगायोग नगर मधील काही नागरिक सोमवारी सकाळी छठ पूजेसाठी आले होते. यावेळी विनीत विनोदकुमार चौधरी हा तरूण बेपत्ता झाला होता. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने दोन दिवस नदी पात्रात शोधमोहिम राबवली. अखेर ७२ तासानंतर आज त्याचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन पथकाला सापडला. मुलाचा मृतदेह पाहताच आई - वडिलांनी नदी घाट परिसरात आक्रोश केला. शिवाजीनगर पोलीसांत याची नोंद झाली आहे.