कोल्हापूरातील एलआयसी कॉलनीत घरफोडी...
पाऊण लाख रुपयांचा ऐवज लंपास
कोल्हापूर - शहरातील कावळा नाका परिसरातल्या एलआयसी कॉलनीत राहणाऱ्या सुजाता रासम या कुटुंबियांसह दोन दिवसांपूर्वी घरगुती कार्यक्रमासाठी परगावी गेल्या होत्या. या दरम्यान चोरट्यांनी रासम यांच्या बंद घराच्या मागील बाजूच्या खिडकीतून घरात प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, इतर दागिने आणि घरात लावलेला डीव्हीआर असा पाऊण लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सुजाता रासम या बुधवारी दुपारी परगावाहून घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनाला आला. या प्रकरणी सुजाता रासम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.