रील स्टार टोळक्याची पोलिसांनी उतरवली मस्ती...

दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी दाखवला हिसका

<p>रील स्टार टोळक्याची पोलिसांनी उतरवली मस्ती...</p>

कोल्हापूर - शहरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील एक तरुणी आणि तिचा मित्र रविवारी चिखली फाटा येथील एका हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी त्या तरुणीच्या ओळखीचे पाच तरुण त्या परिसरात आले आणि त्यांनी तरुणीला आणि तिच्या मित्राला मारहाण केली. या प्रकरणी तरुणीने करवीर पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान त्या टोळक्याने हातात चाकू, कोयता आणि सुरा घेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. याची दखल घेत उत्कर्ष जाधव, अभिषेक पिसाळ, हर्षवर्धन सुतार, अनुराग निर्मळ, प्रथमेश कांबळे या पाच जणांना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी दहशत निर्माण केलेल्या परिसरातून त्यांना फिरवले.