इचलकरंजीत गॅस गिझरचा भीषण स्फोट…दाम्पत्य गंभीर जखमी
इचलकरंजी - शहरातील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे पहाटेच्या सुमारास गॅस गिझरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात आण्णासो आंदरगिसके आणि त्यांची पत्नी मनिषा आंदरगिसके हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की, घराचे गेट उडून समोरच्या रस्त्यावर पडले, तर भिंतींना मोठे तडे जाऊन काही भिंती कोसळल्या आहेत. या स्फोटामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.