फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करणार 

<p>फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करणार </p>

सातारा - फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोघे पोलीस कोठडीत आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
 गोपाल बदनेला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी  न्यायालयाने त्याला 5 दिवसांची 30 ऑक्टोबर पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली होती तर प्रशांत बनकर ला पहिल्यांदा 4 दिवसांची आणि नंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती या दोघांची पोलिस कोठडी आज संपली आहे.