फलटण आत्महत्या प्रकरण : “आत्महत्येमागचं सत्य की षडयंत्र? फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणात नवे वळण

स्वतःचं नाव नोंदवून
कोणतेही दुर्लक्ष

<p>फलटण आत्महत्या प्रकरण : “आत्महत्येमागचं सत्य की षडयंत्र? फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणात नवे वळण</p>

फलटण – फलटण शहरातील एका हॉटेलच्या रूम नंबर ११४ मध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ वाजून २३ मिनिटांनी महिला डॉक्टर दुचाकीवरून फलटणमधील हॉटेलमध्ये दाखल झाल्या. “बारामतीला चालले आहे, रात्र झाली म्हणून एक रात्र राहू द्या,” अशी विनंती त्यांनी केली. स्वागत कक्षात स्वतःचं नाव नोंदवून आधार कार्ड सादर केले आणि “पेमेंट सकाळी करेन,” असं सांगून मध्यरात्री १:३० वाजता रूम नंबर ११४ मध्ये गेल्या. सकाळी ११ पर्यंत दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी दार ठोठावलं. प्रतिसाद न आल्याने सायंकाळी ६:४५ वाजता डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडण्यात आला. आतमध्ये डॉक्टर मृत अवस्थेत सापडल्या. 


➡️हातावर लिहिलेली टीप आणि आरोपींवर गुन्हा.....
महिला डॉक्टरच्या हाताच्या तळहातावर दोन व्यक्तींची नावे लिहिलेली टीप आढळली. त्यात एका पोलीस उपनिरीक्षकावर (PSI) आणि दुसऱ्या व्यक्तीवर बलात्कार व छळाचे आरोप होते. या टीपच्या आधारे पोलीसांनी दोघांविरुद्ध बलात्कार व आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार मृत्यूचे कारण “अस्फिक्सिया (गळा दाबल्याने श्वास बंद होणे)” असे नमूद केले असून, शरीरावर कोणतीही मोठी जखम नसल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.


➡️वाद, राजकीय आरोप आणि तपास...
या प्रकरणावर राजकीय वाद पेटले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, स्थानिक नेत्यांनी “ही आत्महत्या नसून राजकीय षडयंत्र आहे” असा आरोप केला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये डॉक्टर एकट्याच दाखल झाल्याचे स्पष्ट दिसते. कोणतीही बाहेरील हालचाल दिसली नाही. तरीही कुटुंबीयांनी “स्वतंत्र तपास” करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान,  हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी, “त्या रात्रीची सर्व नोंद आमच्याकडे आहे. महिला डॉक्टर एकट्याच आल्या होत्या. आमच्याकडून कोणतेही दुर्लक्ष किंवा गैरप्रकार झाला नाही. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत.” असे पत्रकार बैठकीत सांगितले.