इचलकरंजीत लगीन घाईचा फायदा घेत दागिन्यांवर डल्ला...

लग्न घरातून साडे दहा लाखांचे दागिने लंपास

<p>इचलकरंजीत लगीन घाईचा फायदा घेत दागिन्यांवर डल्ला...</p>

इचलकरंजी - शहरातील आनंद मर्दा यांच्या घरात लग्नकार्य असून त्यानिमित्ताने घरी नातेवाईकांची गर्दी आहे. याच लगीनघाईचा फायदा घेऊन चोरट्याने कपाटात ठेवलेले १० लाख ६८ हजारांचे दागिने हातोहात लंपास केले आहे. चोरट्यांनी मर्दा यांच्या घरातून १६ ग्रॅमचे ब्रेसलेट, १० ग्रॅमची अंगठी, ११ ग्रॅमचे मणी मंगळसुत्र, १० ग्रॅमचे मंगळसुत्र, ३९ ग्रॅमचा नेकलेस, सोनसाखळी, ६ ग्रॅमच्या बांगड्या, सोन्याचे दहा ग्रॅमचे एक नाणे तर पाच ग्रॅमची तीन नाणी, चांदीची गाय असा ऐवज लंपास केला आहे. आनंद मर्दा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.