छठपूजेवेळी इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रातून युवक बेपत्ता

<p>छठपूजेवेळी इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रातून युवक बेपत्ता</p>

इचलकरंजी - छठपूजेसाठी आज सकाळी इचलकरंजीतील पंचगंगा नदी पात्रात योगायोगनगर मधील काही नागरिक नदीकाठावर आले होते. यावेळी विनीत चौधरी आणि त्याचे तिघे मित्र पूजा सुरू होण्यापूर्वी नदीत पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी तिघे काठावर परत आले. पूजा संपवून घरी जात असताना विनीत दिसून आला नाही. त्यानंतर कुटुंबासह नागरिकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तो मिळून आला नाही. या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने  तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने नदीपात्रात शोधमोहीम सुरू केलीय मात्र त्याचा शोध लागलेला नाही.