इचलकरंजीत डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या
इचलकरंजी – शहरातील कबनूर रोड येथे पेट्रोल पंपासमोर एका युवकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून अभिनंदन कोल्हापुरे असं मृत युवकाचे नाव आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. आरोपींचा शोध शिवाजीनगर पोलिस घेत आहेत.