राजारामपुरी पोलिसांची कारवाई : गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक, सव्वा किलो वजनाचा सुमारे ३९ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त

<p>राजारामपुरी पोलिसांची कारवाई : गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक, सव्वा किलो वजनाचा सुमारे ३९ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त</p>

कोल्हापूर : राजारामपुरी पोलिसांनी शेंडा पार्क परिसरात सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा किलो वजनाचा सुमारे ३९ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव मयूर मोतीलाल मिनेकर (रा. रेणुका पार्क, पाचगाव) असे आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला शेंडा पार्क आर. के. नगर रोड परिसरात एका वाहनाच्या आडोशाला गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी कारवाई करण्यात आली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या संदर्भात अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत साळुंखे तसेच अंमलदार कृष्णात पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, नितेश बागडी, सचिन पाटील, सुशांत तळप, अमोल पाटील आणि सारिका गौतम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.