अकरावीत शिकणाऱ्या युवकाची आत्महत्या : वाकरे येथील घटना

<p>अकरावीत शिकणाऱ्या युवकाची आत्महत्या : वाकरे येथील घटना</p>

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील वाकरे येथे ११ वी मध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या युवकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सतेज उत्तम कांबळे (वय १६) असे त्याचे नाव आहे. आज दुपारी ही घटना घडली.आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतेज कांबळे हा इयत्ता अकरावी मध्ये शिकत होता .आज दुपारी साडेचार वाजता त्याने राहत्या घरी तुळईला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबातील सदस्यांनी त्यांला तातडीने बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शव विच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.