संतापजनक : कोल्हापुरात बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घडली घटना...

नराधम बापाला कठोर शिक्षा करण्याची मागणी 

<p>संतापजनक : कोल्हापुरात बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घडली घटना...</p>

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला आहे. या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि दोन लहान मुले कोल्हापूर येथील एका उपनगरात वास्तव्याला होते. मुलीची आई भंगार गोळा करून मुलांचा सांभाळ करीत होती. मात्र, दिवाळी तोंडावर असल्याचे कारण पुढे करून नराधम बापानेतेरा वर्षांच्या मुलीला गावी नेले. शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी साडेसात वाजता आणि बुधवारी (दि.22) पहाटे नराधमाने धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही माथेफिरूने पीडित मुलीला दिली. मुलीने हा प्रकार आईला सांगताच त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
करवीर पोलिसांनी त्या नराधम बापाला अटक केली आहे. त्या नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला संघटनासह सामाजिक संस्थांनी केल्या आहेत.