जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर - आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शिक्षकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. यावेळी पोलीस आणि आत्मदहन करणाऱ्या आंदोलकामध्ये झटापट आणि शाब्दिक वादावादीचा प्रकार घडला.
कागल तालुक्यातील बेनिग्रे येथे राहणाऱ्या शंकर पांडुरंग रामशे या शिक्षकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास, हा प्रकार घडला. दरम्यान रामशे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागल तालुक्यातील बेनिग्रे गावातील आपल्या मालकीचे झाड आणि शेड बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाडल्याचा आरोप या शिक्षकाने केला आहे.