महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला अटक
सातारा – फलटणमधील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. त्यात आरोपी प्रशांत बनकर आणि पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने यांची नावे लिहिली आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला अटक केली आहे. तसेच दुसरा आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरार आहे.