कोल्हापुरात ट्रॅफिक जामवरून दोघांमध्ये हाणामारी...एक गंभीर जखमी 

<p>कोल्हापुरात ट्रॅफिक जामवरून दोघांमध्ये हाणामारी...एक गंभीर जखमी </p>

कोल्हापूर - काल (बुधवारी) रात्री 7 च्या  सुमारास श्लोक हॉटेल, वसंत हरी मल्टीपर्पज हॉल, खांडसरी नाक्या जवळ ट्रॅफिक जामवरून दोघांमध्ये हाणामारी झाली आहे.
अक्षय ओतारी आणि आरबाज बागवान अशी दोघांची नावं आहेत. वाहन मागे - पुढे घेण्यावरून दोघांनी एकमेकांवर हल्ला केला. या हल्ल्यात अरबाज बागवान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात  उपचार सुरू आहे. अरबाज बागवान हा रेकॉर्डवरीलगुन्हेगार आहे. करवीर पोलिसांनी अक्षय ओतारी याला अटक केली आहे.