राज्योपाध्येनगरमध्ये चोरी... 35 लाखाचा ऐवज लंपास

कोल्हापूर – राज्योपाध्येनगरमधील घरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोराने रात्रीच्या सुमारास बंद असलेले घर पाहून सोनं - चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे.
राज्योपाध्ये नगर येथील साई सृष्टी अपार्टमेंट नजीक राहणाऱ्या अरविंद शेट्टी यांच्या घरी ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी 35 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.