दिवाळी सुट्टीसाठी परगावी जाणार असाल तर योग्य ती काळजी घ्या... पोलिसांचं आवाहन

<p>दिवाळी सुट्टीसाठी परगावी जाणार असाल तर योग्य ती काळजी घ्या... पोलिसांचं आवाहन</p>

नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक जण मूळ गाव सोडून अन्यत्र राहतात. सध्या दिवाळी सुट्टी सुरूय. त्यामुळं हे नोकरदार किंवा व्यावसायिक घराला कुलूप लावून कुटुंबासह मूळ गावी जातात. याच संधीचा फायदा घेत चोरटे बंद घरांना लक्ष्य करतायत. गेल्या काही दिवसांत बंद घरातील दागिने, रोकड, किंमती वस्तू लंपास केल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळं दिवाळीसाठी परगावी जाताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड घरी ठेवून जावू नये. आपल्या कॉलनी परिसरात अनोळखी व्यक्ती संशयास्पद रित्या फिरताना आढळून आल्यास ११२ या नंबरवर पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असं आवाहन शहर पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांनी केलंय.