कोल्हापुरात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून लांबवली...

कोल्हापूर – शहरातील रुईकर कॉलनी परिसरातल्या रॉयल रिट्रीट अपार्टमेंटमध्ये प्रमोदिनी हवालदार या आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्या अपार्टमेंटच्या गेटचा दरवाजा उघडत होत्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली आहे. या प्रकरणी प्रमोदिनी हवालदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.