बिबट्याचा कहर : परळी निनाई परिसरात वृद्ध दांपत्यावर बिबट्याने केला हल्ला...दोघांचा मृत्यू

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई येथे आज (रविवार) पहाटे शेळीपालनासाठी गेलेल्या एका वृद्ध दांपत्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्या दोघा दांपत्यांचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
निनो यशवंत कंक आणि पत्नी रखूबाई निनो कंक अशी त्यांची नावं ते गोलीवणे येथील रहिवासी आहेत. आज सकाळच्या सुमारास दोघे शेळ्यांना चारण्यासाठी परळी निनाई परिसरात गेले होते. मात्र काही तासांनी त्यांची हालचाल बंद झाल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला असता रखूबाईंचे शरीर गंभीर अवस्थेत सापडले, तर निनोंचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि शाहूवाडी पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धावल घेतली. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परळी निनाई परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. नागरिकांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरे बसवून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.