बारशाच्या कार्यक्रमात बारबाला आणून अश्लील नृत्य - नंदगावात धिंगाणा; इस्पुर्ली पोलिसांची कारवाई

<p>बारशाच्या कार्यक्रमात बारबाला आणून अश्लील नृत्य - नंदगावात धिंगाणा; इस्पुर्ली पोलिसांची कारवाई</p>

इस्पुर्ली - घरातील बारशाच्या कार्यक्रमात बारबाला आणून अश्लील नृत्य करत धिंगाणा घालणाऱ्या नंदगावमधील सहा जणांसह दोन बारबालांना इस्पुर्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

करवीर तालुक्यातील नंदगाव येथे बुधवारी रात्री बारशाच्या कार्यक्रमानंतर अश्लील नृत्याचा प्रकार समोर आला आहे. रणजीत पोवार यांच्या घरात बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी विधी पार पडल्यानंतर सायंकाळी त्यांनी आपल्या मित्रपरिवारासोबत रेणुका मंदिराच्या मागे असलेल्या सार्वजनिक जागेवर बारबालांना बोलावून अश्लील नृत्याचे आयोजन केले. या प्रकाराची माहिती मिळताच इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. एस. शेख यांच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा कारवाई केली. या कारवाईत रणजीत पोवार, मिथुन पोवार, अनिल पोवार, सचिन पवार, राजकुमार चव्हाण, राहुल जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन बारबालांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इस्पुर्ली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.