धक्कादायक : कोल्हापुरात दारूसाठी मुलाने केला आईचा खून 

<p>धक्कादायक : कोल्हापुरात दारूसाठी मुलाने केला आईचा खून </p>

कोल्हापूर – शहरातील साळुंखे पार्क परिसरात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने पहाटेच्या सुमारास आईच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  
सावित्री निकम असे महिलेचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी सकाळी संशयित मुलाला अटक केली आहे.