इचलकरंजीतील शहापुरात तीन पानी जुगार अड्डड्यावर छापा... दहा जण ताब्यात

<p>इचलकरंजीतील शहापुरात तीन पानी जुगार अड्डड्यावर छापा... दहा जण ताब्यात</p>

इचलकरंजी - शहरालगत शहापूर मधील गैबान पेट्रोल पंपाजवळील ओढ्याजवळ तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आहे.

या कारवाईवेळी युहान भोरे, प्रभाकर माळगे, मुबारक तांबोळी, अजय लोंढे, प्रविण जाधव, विनायक जगताप, दिपक कांबळे, शिवानंद आवटी, हुसेन मौला अंकलगे आणि फ़क्रुदीन मुल्ला हे जुगार खेळताना आढळून आले आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक साबळे, सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे, पोलिस हवालदार सुनिल पाटील, फ़िरोज बेग, असिफ़ शिराजभाई, सदाम सनदी, मगदुम व आयुब गडकरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.