रेकॉर्डवरील दुचाकी चोरटयाला अटक...चोरीच्या दहा दुचाकी जप्त

<p>रेकॉर्डवरील दुचाकी चोरटयाला अटक...चोरीच्या दहा दुचाकी जप्त</p>

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  एका रेकॉर्डवरील दुचाकी चोरट्याला  शाहू टोलनाका परिसरातून ताब्यात घेतले आहे.  अक्षय शेलार  असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा दहा लाख रूपये किंमतीच्या चोरीच्या पंधरा दुचाकी जप्त केल्या आहेत.

 अक्षय शेलारने शाहूवाडी तालुक्यातील त्याचा साथीदार विजय गुरवच्या मदतीने कोल्हापूरसह इचलकरंजी, सांगली, राजापूर, कुडाळ या परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून अक्षय शेलार याचा साथीदार विजय गुरवचा शोध घेतला जात आहे.