कोल्हापुरातील गंगावेश भाजी मंडई परिसरात अपघात...महिलेचा जागीच मृत्यू

कोल्हापूर - शहरातील गंगावेश भाजी मंडई परिसरात अपघात झाला आहे. या अपघातात एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले गावातील 62 वर्षीय सुशीला कृष्णात पाटील या नेहमीप्रमाणे शाहू उद्यान कॉर्नर जवळ दही विकण्यासाठी बसल्या होत्या. यावेळी त्यांना ओमनी गाडीने धडक दिली आहे या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी इतर दोन महिलाही जखमी झाल्या आहेत.
गंगावेश परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि खाजगी गाड्यांची पार्किंग केल्या जातात. यामुळे या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे.कोल्हापूर महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे या परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याच्या वारंवार तक्रारी करून देखील याकडे कानाडोळा केला जात आहे त्यामुळे अशा घटना घडत असल्याच्या चर्चा स्थानिक नागरिकांमधून केल्या जात आहेत.