कसबा वाळवे येथे तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात, रोकड व दुचाकी जप्त

<p>कसबा वाळवे येथे तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात, रोकड व दुचाकी जप्त</p>

राधानगरी: कसबा वाळवे येथे सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर राधानगरी पोलिसांनी छापा टाकून सात जणांना रंगेहाथ पकडलं. त्यांच्या ताब्यातून एकूण 61,465 रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पकडलेल्यांमध्ये भाऊसो कांबळे, विशाल कांबळे, संदीप कांबळे, अरुण कांबळे, जयसिंग कांबळे, जनार्दन कांबळे आणि उत्तम सुर्वे (सर्वजण रा.कसबा वाळवे) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माने व पोलीस कर्मचारी कृष्णात खामकर यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.