बीड जिल्हयातील भाविकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यु...

<p>बीड जिल्हयातील भाविकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यु...</p>

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त दर्शनासाठी बीड जिल्ह्यातील केज मधील अशोक रामकिशन सौदागर हा युवक मित्रांबरोबर आला होता. आज सकाळी तो कृष्णा नदीत अंघोळीसाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

 या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनमधील वजीर रेस्क्यू टीमचे रौप पटेल यांना देण्यात आली. त्यानंतर ते टीमसह घटनास्थळी दाखल झाले. नदी पात्रात सुमारे तीन दिवस शोधमोहिम राबवून अशोकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह पाहताच सोबत आलेल्या मित्रांना अश्रू अनावर झाले. शिरोळ पोलिसांनी पंचनाम केला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.