सिद्धार्थनगर दंगल प्रकरण: आणखी 15 आरोपींना अटक, 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

<p>सिद्धार्थनगर दंगल प्रकरण: आणखी 15 आरोपींना अटक, 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी</p>

कोल्हापूर – 22 ऑगस्ट रोजी सिद्धार्थ नगर परिसरात झालेल्या दंगलप्रकरणी तपासात मोठी कामगिरी करत लक्ष्मीपुरी पोलिसांनी आणखी 15 आरोपींना अटक केली आहे. याआधी 10 जणांना अटक झाली होती. आता एकूण अटक आरोपींची संख्या 25 झाली आहे.

22 ऑगस्ट रोजी रात्री एका मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त लावलेल्या डिजिटल फलकावरून दोन गटांत वाद झाला होता. हा वाद मोठा होऊन दगडफेक, जाळपोळ आणि मारामारी झाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 100 हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील 10 जणांना अटक झाली होती. आणखी नवीन 15 आरोपींना अटक केली आहे. शाहरुख शेख, तौसीफ पटवेगार,साहिल पटवेगार, तनवीर मुजावर, नौशाद मुजावर, अब्दुलरौफ सिद्दीकी,जरियाफ इनामदार, समीर गॅरेजवाला,आश्रफ सिद्दिकी,इजाज शेख,साहिल हकीम,परहाज नाईकवडे,चीलाल शेख,आकिब सिद्दिकी,रिजवान पटेकर अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान या पंधरा आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 15 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.