बनावट नोटा प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून बडतर्फ; पोलीस अधीक्षकांची कठोर कारवाई

<p>बनावट नोटा प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून बडतर्फ; पोलीस अधीक्षकांची कठोर कारवाई</p>

कोल्हापूर जिल्ह्यातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेले पोलीस नाईक इब्रार सय्यद आदम इनामदार यांच्या विरुद्ध मिरज मधील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.ना. इब्रार इनामदार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतुदींचा भंग करून शंकास्पद सचोटी व वर्तन दाखवले असून, पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल असे कृत्य केल्याचे निदर्शनास आले आहे. कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असूनही त्यांनी भारतीय न्याय संहितेतील तरतुदींचा भंग करत बनावट भारतीय चलन नोटा तयार करणे, विक्री करणे व वापरणे या स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले आहेत.असे प्रकार करणे हे केवळ सेवा नियमांचे उल्लंघन नसून देशविघातक कृत्याशी संबंधित आहेत हे स्पष्ट झाले आहे. विभागीय चौकशी व प्राथमिक चौकशी करणे लोकहितास प्रतिकूल असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी इब्रार इनामदार याला शासकीय सेवेतून बडतर्फ (Dismissal from Service) करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई संबंधित कर्मचाऱ्याच्या गुन्ह्यात अटकेच्या दिवसापासून तत्काळ लागू करण्यात आली आहे.